महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा

MPSC Rajyaseva Prelims Exam Syllabus & Pattern - संपूर्ण माहिती आणि अभ्यासक्रम

परीक्षेचा आराखडा

अ.क्र. पेपर क्रमांक गुण कालावधी मानक माध्यम पेपर चे स्वरूप
१ पेपर १ (अनिवार्य) २०० २ तास पदवी मराठी / इंग्रजी वास्तुनिष्ठ / बहुपर्यायी
२ पेपर २ (अर्हताकारी) २०० २ तास घटक १ ते ५: पदवी स्तर
घटक ६: दहावी स्तर
घटक ७: दहावी आणि बारावी स्तर
मराठी / इंग्रजी

टीप:
१) पेपर क्रमांक २ मध्ये किमान ३३ टक्के गुण आवश्यक.
२) पेपर २ मध्ये ३३ टक्के गुण प्राप्त उमेदवाराची पेपर १ च्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking)

अपवाद: पेपर १ आणि पेपर २ मधील "निर्णय घेण्याची क्षमता" (Decision Making) आणि "समस्या सोडवणे" (Problem Solving) या प्रश्नांना नकारात्मक गुणपद्धती लागू नाही.

अभ्यासक्रम पेपर १ (General Studies) - २०० गुण

अ.क्र. विषय
१राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
२भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ (महाराष्ट्राच्या भारांशासह)
३महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल (प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक)
४भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन (संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण)
५आर्थिक व सामाजिक विकास (शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम)
६पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल (यावरील सर्वसाधारण प्रश्न)
७सामान्य विज्ञान

पेपर २ (CSAT) - २०० गुण

अ.क्र. विषय
१आकलन (Comprehension)
२संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य
३तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
४निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
५सर्वसाधारण मानसिक क्षमता
६मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, इयत्ता दहावी स्तर), विदा अनुयोजन (तक्ता, आलेख, इयत्ता दहावी स्तर)
७मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी / बारावी स्तरावरील)

महत्त्वाच्या टिप्स